Wednesday, September 15, 2010

सहज आठवलं..........

  मी लहान असताना मी म्हणायचे मला सिनेमात जायचं.
सगळे विचारायचे "का?"
मी म्हणायचे तिथे गेलं कि लवकर मोठं होतं.
(म्हणजे पळतापळता तो छोटा मुलगा एकदम अमिताभ व्हायचा तसं....... )
मग सगळे हसायचे........
पण आता मला थोड वेगळं म्हणावं वाटतं......
सिनेमात गेलं कि लहानाचं लवकर मोठं होतं पण मोठे लवकर म्हातारे नाही होत.....
किंवा म्हातारे परत लहान होऊ शकतात....
(आता इथे पण अमिताभ आजोबांचाच उदाहरण द्यावं लागेल........)
(अभिनंदन 'पा'.................)
बरोबर ना...............

Sunday, September 5, 2010

माणूस माझे नाव

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...

    बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
    परी जिंकले सातहि सागर
    उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
    मीच इथे ओसाडावरती
    नांगर धरुनी दुबळ्या हाती
    कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
    ही शेते अन् ही सुखसदने
    घुमते यातून माझे गाणे
    रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
    सुखेच माझी मला बोचती
    साहसास मम सीमा नसती
    नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...

श्रम - सरितेच्या तीरावर

वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्^थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!


संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेcया डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्^रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्श्सनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!


खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!

माझे कलियुग-बाबा आमटे

पुराणांनी माणसांची उंची मापली
तेव्हा हिमालय मोठा होता
पण आता माणूस हिमालयाहून
किमान साडेपाच फूट उंच झाला आहे!

आणि कलियुगाचा धिक्कार करणार्‍या युगांनी
ज्यातून कली शिरला ते धर्मराजाचे
सडलेले बोटच तेवढे पाहिले होते
आणि त्यांच्या घोडदौडीला
अटकेवरच अटक बसली होती
अटकेवर ज्यांचे घोडे थांबतात
त्यांच्या पराक्रमाचे अखेर पानिपत होते
भूतकालाच्या स्मृती आणि भविष्याच्या भीती
यांनी ज्यांच्या मनात गर्दी केली होती
वर्तमानातून वाट काढता येत नव्हती
म्हणून जीवनाचा नकाशा ज्यांना समजला नव्हता
आणि म्हणून भूतकाळाला जे माहीत नव्हते
आणि भविष्य ज्याबद्दल मौन होते
ते ज्यांना कळत नव्हते
आणि त्या मौनातील कर्तृत्व साठवायला
ज्यांच्याजवळ जागा नव्हती
त्या धर्माच्या जो - जो गोळ्यांनी
झापडलेल्या युगांना ज्याचे आकलन झाले नाही
ते हे माझे कलियुग!

ती युगे आपल्या प्राचीन प्रेतांचे पूजन करीत
पळीपंचपात्रात सागराची आचमने देत बसली
आणि जग कोठल्या कोठे निघून आले!
त्यांचे लांड्या सोवळ्यातले अध्यात्म
जीर्ण गंजलेल्या शिव धनुष्याचाच
महिमा गात बसले
पण शिवधनुष्याचा महिमा गाणारे
ते उचलू शकत नाहीत
आणि इतिहासात रेंगाळणारे
इतिहास घडवू शकत नाहीत!



माझे कलियुग आता त्या षड्दर्शनांच्या
रेशमी गुंतावळी उलगडत बसणार नाही
प्रत्यक्ष सत्यांच्या धारदार पात्यांनी
त्या चराचरा कापीत ते जाईल

कलियुगाला आरोपीच्या पिजर्‍यात
ज्यांनी उभे केले
त्यांनीच त्या पुरातन युगांचे कबुलीजबाब
घेऊन ठेवले आहेत.
सत्ययुगाने अमृत वाटताना
असत्याशी केलेली तडजोड
त्याला नाकारता येणार आहे काय?
गुरुपत्नीशी संभोगापर्यंतची पापे करणारे ते युग
त्याच्या शवावर शापाची क्षते अजून कायम आहेत
गर्भवती पतिव्रतेचा परित्याग
आणि शूद्राच्या साधनेचा शिरच्छेद करणार्‍या
त्या त्रेता युगालाही त्रिवार वंदन असो!

अर्धांगिनीचा जुगार खेळणारे
आणि माणूस की हत्ती म्हणून वेळ मारुन नेणारे
द्वापारातील त्या धर्मात्म्यांचे वारसदार
अजून आपल्या भाकड गाईंचे
रक्षण करीत बसले आहेत
अरे, अशी कोणती पापे आहेत
जी कलियुगाने केली
आणि त्या युगात झाली नाहीत?
असे कोणते दैन्य आहे जे कलियुगाने पाहिले
पण त्या युगांनी भोगले नाही?

अश्वमेधाच्या थंड वेदीत लोळलेला मुंगुस
ती सारीच युगे तुडवीत आला नव्हता काय? 

माझे कलियुग हे त्या उद्याच्या 'महामानवाचे सागरतीर'
ज्याला धीरे धीरे जाग येत आहे
विराटाची पाने कधी संपत नाहीत
धुळीतील बाराखडी गिरवता गिरवताच
ती पुरातन युगे उलथून पडली
कलियुग आता आकाशाची पाने वाचू लागले आहे
त्या पुरातन कल्पांच्या कल्पनेतही न मावलेले

लक्ष लक्ष प्रकाशवर्षांच्या पलिकडल्या महाविस्तारापर्यंत
त्याच्या दुर्बिणीचा डोळा जाऊन भिडला आहे
आणि ते नासदियाचे आदिरहस्य
त्याच्या प्रयोगशाळेच्या परीक्षणनळीत
केव्हा तरी पकडले जाणार आहे
शूद्रांच्या समूहांना मिठीत घेऊन
कलियुग लिहीत आहे आता 'मनुष्यायन'
आणि ते पहा लोहपंख्यांचे साहसी थवे
आकाशाचे अग्निचुंबन घेण्यासाठी
त्रेत्यातल्या वायुपुत्राहून उंच झेपावले आहेत
अणूच्या घोड्यावर बसून
आकाशगंगेला पालाण घालीत
माझे कलियुग अटकेपार जाऊन पोचले आहे तेथे
जेथे त्या तमाम प्राचीन युगांना प्रकाश देणारा सूर्य
हा फक्त एक पिग्मी आहे!
 

गतीचे गीत -बाबा आमटे

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले

मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई दुःख उधळायास

त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला

एकटे एकत्र आले आणि हा जत्^था निघाला
घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते
पांगळ्यांना पत्^थरांचे ते खडे आव्हान होते
टाकलेली माणसे अन् त्यक्त ती लाचार माती
त्यातुनी आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती
पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले
आसवे अन् घाम यांचा आगळा शृंगार चाले
वेदनेच्या गर्द रानी गर्जली आनंद द्वाही दुःख उधळायास

कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्त गंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई दुःख उधळायास

Sunday, June 27, 2010

ब्रेडविनर,परवाना आणि मी....

 मी २-४ दिवसंखाली  अपर्णा वेलणकर यांनी अनुवादित केलेल्या ब्रेडविनर आणि परवाना या कादंब-या वाचल्या.
आणि त्या वाचताना मी त्यात इतकी गुंतत गेले कि मी स्वतः त्या परवाना सोबत तिथे आहे असं मला वाटू लागले.
ती भीती,दहशत, मृत्युच्या भयाण सावटाची भीषणता,आणि त्यासोबत दोन हात करायची साहस असलेली परवाना....
या सगळ्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत अस मला वाटत होतं. ती भुकेल्या पोटी फिरत असताना.. असेल तसलं.. शिळं-पाकं अन्न पुरवून स्वतः आणि सोबतच्या छोट्या मुलांना खाऊ घालत असताना आणि कित्येक दिवस उपाशी पायपीट करत असताना मी पण तिथे तिच्या सोबत आहे असच सारख वाटत होतं.
  या वातावरणात मी इतकी गुरफटले होते कि मी ते शब्दात नाही सांगू शकणार कदाचित.
पण त्या दिवशी मी रात्री जेवणार नव्हते आणि प्रवीणपुरता भात होता. त्याने जेवता जेवता मला विचारलं तुला भूक लागली तर....
मी त्याच वातावरणात... मला दोन मिनिट खरेच काही सुचले नाही वाटलं मी परवानासोबातच आहे. आणि २ मिनिटांनी  भानावर आल्यावर मला इतक छान वाटलं....
मी उत्तर दिलं... मी भारतात आहे... इथे लोकशाही आहे.. मी घरात सुखरूप आहे... आणि घरात करून खाण्यासाठी भरपूर काही आहे... मी करून खिन काही तरी....
  खरं सांगते माझ्या डोळ्यात तेंव्हा पाणी होतं. माझ्या मनात एक अजब मिश्रण होतं. आनंद, भीती, दहशत,आणि मी जो स्वार्थीपणाचा विचार केला त्याची लाज....
    पण काहीही असो माणूस स्वार्थी असतोच. त्याला स्वतः सुखी आहोत यापेक्षा दिलासा देणारी गोष्ट जगात नसते.
पण 'तालिबान' या शब्दातली भयावहता मला अशी जाणवली...अशा लाखो परवाना आणि त्यांची कुटुंबे हे कित्येक वर्ष सहन करतायत त्याच्याशी लढा देत आहेत.
त्यांना माझा 'सलाम'.
  का अशी माणसं माणसांच्या जीवावर उठतात.... का इतक्या छोट्या मुलांच्या नशिबी असे भोग... का? हा प्रश्न मनातून जात नाही....
देवाकडे एकाच मगन मागावे वाटते.... देवा जगात कधी कुणालाच दुःखी ठेऊ नकोस... आणि छोट्या लेकरांना तर नकोच नकोच.... कुणाच्या मनात अत्याचार करण्याचे विचार येऊ नयेत.... कुणावर अत्याचार होऊ नयेत.... सगळे सुखी राहावेत..... ज्ञानेश्वरांचे पसायदान पूर्ण व्हावे....
 
 

Wednesday, April 28, 2010

क ला काना का!

दमलेल्या बाबाची गोष्ट!

Sunday, April 25, 2010

एक आलेला ई-मेल

माझे उत्तर

राजे सांगून येणार नाहीत....
आले तर परत जाणार नाहीत...
अनुशास्त्रांच्या युगात तलवार घेतील...
इतकेही ते वेडे नाहीत...
दूरदृष्टी त्यांची कधी...
आपल्या ध्यानी येणार नाही....
आता राजे असते तर...
मार्केट आधी काबीज झाले असते...
चलनवाढ होण्याऐवजी पिक पाणी वाढले असते...

  इथे देशाचा विकास म्हणजे आपली प्रगती खुंटते...
शेतीवर सेझ बांधून धान्य टंचाई वाढते...
बायकापोरी बद्दल तुम्ही खरच आदर दाखवता?
  होणा-या अत्याचारावर निषेध तरी नोंदवता...

शंढ समाजाने कधी तक्रार करू नये...
आणि वीर पुरुषाला खरं तर बोलावूही नये...

गेला इतिहास गेला गड्यांनो
कितीदा तोच घोकणार...
इतिहासामधून  खरं..
आपण कधी शिकणार.....
आपला शत्रू आता खरं तर...
आपणच शोधून तुडवला पाहिजे...
आपणच प्रत्येकातून.....
नवीन  "शिवाजी" घडवला पाहिजे.......

"जय भवानी...  जय शिवाजी..."

--स्वरचित

Thursday, April 22, 2010

"राग"

बसल्या बसल्या असाच विचार आला...
"राग" हा एकच शब्द मराठी भाषेत दोन परस्परभिन्न गोष्टींमध्ये कसा काय वापरण्यात आला असावा?
म्हणजे संगीतासारख्या मार्दवपूर्ण कलाकृतीमध्ये वेगवेगळे "राग" असतात....
आणि मानवी जीवनातल्या सहा शत्रुंपैकी एक "क्रोध" म्हणजे "राग"......
.... मराठी भाषाकाराचे हे अजब मिश्रण मला ब-याच वेळा कोड्यात पाडून जाते...
पण एक मात्र खरं की "राग" आला तरच राग कळतो........

अशाच मराठीतल्या तुम्हाला कोड्यात टाकणा-या शब्दांबद्दल ऐकायला निश्चित आवडेल.....

Wednesday, April 14, 2010

FREEDOM IS NOT FREE .... Part III

FREEDOM IS NOT FREE .... Part II

FREEDOM IS NOT FREE .... Part I

काही विचार!3

काही विचार!:2

काही विचार!

Proud to be Indian - Shiv Khera (3 of 3)

Proud to be an Indian - Shiv Khera (2 of 3)

Proud to be an Indian

Shiv Khera Country First

Make India Proud - Proud to be Indian

Wednesday, April 7, 2010

अमृतवेल : वी. स. खांडेकर (...आणि एक प्रश्न )

बरेच दिवस वी. स. खांडेकरांची "अमृतवेल" वाचायची होती.
काल परवा तो योग आला. अगदी एकहाती वाचावी अशी कादंबरी आहे (छोटीही आहे!)
 मानवी जीवन नव्हे आशावादी मानवी जीवन कसे असते आणि कसे असावे याचे अतिशय सुंदर चित्रण या कादंबरीत केले आहे.
दुस-याच्या दुःखात आपले दुःख माणूस कसे विसरून जातो याचे अप्रतिम वर्णन आहे.
दुस-याकडून अपेक्षा करताना स्वतःची कर्तव्ये कशी विसरली जातात.
सूडभावनेपोटी होणारं माणसाचं अधपतन आणि पर्यायाने स्वतःचा नाश हे जीवनाचे जीवनाचे समीकरण सांगितले आहे.
मानवी जीवनातले प्रेम ही भावना कशी व्यापक आहे... ती फक्त नात्यांमध्ये अडकून रहात नाही... ती समदुखी.... समविचारी...  लोकांना बांधून ठेवणारा एक धागा आहे.
त्याला नात्याचे...वयाचे...बंधन नसते...
प्रेम म्हणजे वासना नव्हे किंवा आकर्षण ही नव्हे...
पण समवयस्क लोक असतील तर या प्रेमाला आकर्षणाची किनार मिळणेही स्वाभाविक आहे.
पण म्हणून ते प्रेम  लगेच कलंकित होऊ शकत नाही.
असे प्रेम उदात्त असते. त्यात स्वार्थ नसतो. आणि कुणाचे नुकसानही नसते.
असा उदात्त प्रेमाचा अविष्कार आहे.

पण.....
असा उदात्त प्रेमाचा अविष्कार मांडता मांडता खांडेकर अचानक या भावनेला परत नात्यातच का गुंतवून टाकतात ते काही काळात नाही....
या भावनेला शेवटी ते बहिण-भावाच्या नात्यात अडकवून टाकतात...... असे का?
या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही.
जर तुम्हाला मिळाले तर..............
मी उत्तराच्या प्रतीक्षेत आहे

( ता. क.:  पुस्तक जरूर वाचा...... अनेक सुंदर वाक्यांनी सजलेली कलाकृती.... मला आवडलेली वाक्ये लवकरच पोस्ट करणार आहे.)

Monday, March 29, 2010

रस्त्यांचे शिल्पकार

    उडत उडत कानावर बातमी आलेली होतीच म्हणे कर्वे नगरच्या सगळ्या गल्ल्यांचे काही दिवसात डांबरीकरण होणार... आणि चक्क या कामाला सुरुवातही झाली हो!
  आणि पहिली प्रतिक्रिया मनात आली ती आता चार-एक दिवस तरी आवाजाची कटकट सहन करावी लागणार. (कसं आहे एव्हाना खराब रस्त्यांची चांगली सवय झालेली आहे. त्यातून आम्ही मराठवाड्यातले आणि त्यातून उस्मानाबादचे त्यामुळे लहानपणापासूनच "असे रस्ते प्यार आम्हाला..." असो...)
  आणि कालपासून कामाला सुरुवात झाली... आवाजाचा त्रास होत होता... काय चाललाय बघावं म्हणून  बाहेर गेले... आणि खरं सांगू... खिळून राहिले ते काम बघत...
  एखादा कलाकाराची नवनिर्मिती बघताना जो आनंद होत असतो तोच मी माझ्या अंतर्मनातून अनुभवत होते...
 रणरणत्या उन्हात ही मंडळी काम करत होती (मनात परिस्थितीला शिव्या घालत असतीलही ).
एक ट्रक भरून खडी "पावर पेवर मशीन",मध्ये टाकायचे. एक माणूस झारीमध्ये "टार" ओतून तो रोडवर एखाद्या चित्रकाराप्रमाणे रस्त्याच्या कागदावर जणू  रेघोट्या मारत होता...
 त्यावरून ती
"पावर पेवर मशीन" सफाईने खडी ओतत येत होती आणि सोबतच त्यावरून रोलर फिरल्याने तो ढीग सपाट होत येत होता... सोबतचे गुणी जन कुठे जास्तीची पडलेली खडी काढून टाकत होते... कुठे चुकून खड्डा... खोचा राहिलेल्या असतील तर तेथे खडी अत्यंत सफाईने पसरत होते...
 अत्यंत सुंदरपणे हा कार्यक्रम पार पडत होता आणि रस्त्याचं रूपही पालटत होतं.
 आता शेवटचा हात.... "रोड रोलर" त्या पूर्ण रस्त्यावरून फिरत होता...आणि बघता बघता रस्त्याचं स्वरूप पालटत होतं.

 बघता बघता त्या रस्ताने जुनी लक्तरे फेकून देऊन नवी काळी पैठणी नेसून घेतली होती.
एका नवीनच एकरूपतेचं दर्शन मला घडत होतं... वाटलं असं कोणता माणुसकीचा "रोलर" तयार करता येईल कि जो फिरवून  सर्व धर्मांची खडी... रंगाचां टार... भाषेचा डांबर...  एकरूप होऊन जाईल.... हिंसा, द्वेष, अंधश्रद्धा  यांचे खाच खळगे बुजून जातील.... आणि मोक्षाकडे जाण्याचा एक सुंदर... सरळ...सहज आणि सोपा मार्ग तयार होईल.....
 

Thursday, March 25, 2010

पैसा बोलता है!!!

खरं सांगू आज गप्पा मारायचा जाम मूड आहे माझा; पण तेव्हडा रिकामा वेळ आहे कोणाला?
मला स्वतःला काम करायची विशेष आवड नाही आणि आज तर मूड पण नाही बळजबरी काम करण्याचा.
आज निवांत बसून जुन्याच विषयांवर गप्पा माराव्यात म्हणते.
 खरं सांगा तुम्हाला तुमच्या जीवनातला कोणता काळ सगळ्यात रम्य वाटतो? मी सांगू? अर्थात बालपण... नाही का?
परीक्षेशिवाय कसलाही दडपण नाही. चिंता नाही. असली तरी जाणवायची नाही. आता वाटते तशी उगीच वाटणारी तगमग नाही.
 पण गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी...
 मला आता जॉब नाही आणि खरं तर मनापासून इच्छाही नाही.
 मला खर सांगू काय करायला आवडतं... निवांत गप्पा मारायला... फिरायला.... गाणी ऐकायला...कविता लिहायला.... वाचन करायला...
खरच फक्त या कामासाठी मला पैसे मिळाले असते तर.... असाही विचार बराच वेळा मनात येतो.... तुम्हाला नाही वाटत कधी असं?
पण आता या निवांतपणाचाही कंटाळा आलाय.
होतं काय आपण असतो निवांत पण सगळे नसतात त्यावेळी... आणि मग आपली उगीच चीड चीड होत राहते की आपल्याला कोणी वेळ देत नाही. आपल्याला कोणी समजून घेत नाही. समोरच्या व्यक्तीला वाटत असत की हि व्यक्ती काय रिकामीच आहे तिला काय माहिती  आपल्याला किती ताप आहेत ते...  म्हणून मग त्याची चीड चीड...  वैताग...
आता हे सगळं आपल्याला कळत असतं........ पण वळत नाही त्याचं काय........ 

मग या सगळ्या त्रासापासून मुक्ती मिळवायची तर आपण गुंतून राहणे.
गुंतवून घ्यायचे  अनेक मार्ग आहेत हो पण त्यासाठी परत लागतो तो पैसा.......
म्हणून मग काय तर शेवटी उपाय जॉब......
खरं कस ना आपल जीवन नेहमीच दुस-यावर अवलंबून असतं.
    असो आता माझी गरज आहे स्वतःला गुंतवून घेणं. आणि त्यासाठी आता इंटरविव्यूची तयारी करायचीय. करावीच लागेल कारण बाबानो..शेवटी........
पैसा बोलता है!!!
     

Tuesday, February 2, 2010

प्रयोजन

आपण सगळेच जण कित्येकदा किती तरी विषयांवर चर्चा करत असतो. समाजाला, देशाला, त्याच्या व्यवस्थेला बहुतेकदा नाव ठेवत असतो आणि कधीतरी नावाजातही असतो. पण हे सगळे विषय मग तिथल्या तिथे सोडून त्याच्याकडे पाठ करून जीवन जगायलाही सुरु करत असतो. पण मनातले हे विचार खरच तिथल्या तिथे संपतात का? आपले प्रश्न तिथल्या तिथे सुटतात का? हि अस्वस्थता कुठेतरी मांडायला हवी म्हणून या "शिळोप्याच्या गप्पा"!
मी माझे विचार इथे मांडल्याने समाज बदलेल का नाही मला माहित नाही. पण माझे विचार कमीत कमी कुठेतरी मांडले याचा आनंद नक्की राहील.
अशाच विविध विषयांवर गप्पा मारायला सर्वाना आमंत्रित करत आहे. आणि अर्थातच या असतील सर्वांच्याच आवडत्या "शिळोप्याच्या गप्पा"