तर...


परवा बसल्या बसल्या एक विचार आला की खरच देव आहे अणि तो मुख्य म्हणजे अस्तिवात आहे.
त्याचं आपल्या सर्वावर नियंत्रण आहे. आणि या गोष्टीची माला जेवढी भीती वाटली तेवढी कधीच नाही वाटली.
आपण समजा या पृथ्वीवरचे नाहीतच.... म्हणजे असं बघा माणूस आणि पृथ्वीवरचे इतर प्राणी यांच्यात मुळात साम्यच दिसत नाही. मग आपण या पृथ्वीवर उपरे नाहीत कशावरून?
आता थोडं स्वर्ग या कल्पनेचा विचार करू....
आपण गृहीत धरू की स्वर्ग हि नुसती कल्पना नाही तर ते एक वास्तव आहे... तो एखादा ग्रह आहे किंवा तत्सम काहीतरी आहे. तिथले जीव म्हणजे देव.
आता आपले देव आहेत ३३ कोटी. म्हणजे हि गणना आपल्याला ज्ञात होती तेंव्हा त्या ग्रहावर ३३ कोटी देव राहत होते.
हे अतिशय प्रगत जीव. त्यांना दुसऱ्या ग्रहांवर संचार करता येत असेल. त्यांच्याकडे प्रगत शस्त्रास्त्र असतील.
आणि त्याचवेळी पृथ्वीवरचे मूळ रहिवासी होते राक्षस नामक जीव....
...तर आता या देव नावाच्या जीवाची दृष्टी पडली या राक्षस नावाच्या जीवावर... मग या देवांनी आपले काही प्रतिनिधी पृथ्वीवर पाठवले. काही राक्षसांशी युद्ध केले. काहीना आमिष(ज्याला आपल्या पौराणिक भाषेत वर म्हंटले आहे ) दिले.
आणि हळू हळू या पृथ्वीवर आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. हे तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं
की एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर नियंत्रण ठेवता येत असेल.

आपण महाभारत रामायणात बघितले की मंत्र पुटपुटून त्यांना हवी ती शस्त्रास्त्रे मिळत असतात. म्हणजे तेही एक तंत्रज्ञान म्हणूया की हि एक प्रकारची voice-technology होती की... त्या त्या व्यक्तीला ते ते शस्त्र एखादा विशिष्ट पासवर्ड(ज्याला आपल्या पुरण कथेत मंत्र म्हटले आहे ) उच्चारला की मिळत होते.... यातली काही शस्त्र चमचेगिरी (पुरांकथेत ज्याला तप म्हंटले आहे ) करून किंवा तहात काही राक्षसांनाहि मिळाली होती...

अशी पृथ्वीवर हळू हळू सत्ता प्रस्थपित करण्यासाठी स्वर्ग या ग्रहावरून बऱ्याच वेळा अनेक देवांना पृथ्वीवर याव लागलं असेल. पण त्यात भरीव कामगिरी केलेल्या देवांना अवतार म्हणून संबोधण्यात आले. पुढे याच देवांची वंशवेल विस्तारली. आणि ती वंशवेल म्हणजे माणूस.

पण स्वर्ग नावाचा ग्रह आणि तिथल्या देव नावाच्या देवच तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की इथल्या पाठवलेल्या प्रतिनिधींवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे.
त्यामुळे जर हे प्रतिनिधी डोईजड झाले की ते नवीन प्रतिनिधी पाठवत असावेत.

म्हणून अनेक वेळा आपण देवांच्या कुलाचा विनाश झालेलाही ऐकला आहे.
किंवा तो फक्त एक स्वभावहि असू शकतो आणि पुढची पिढी तेवढी कार्यक्षम न ठरल्यामुळे परत स्वर्गातून पुढचा प्रतिनिधी इथे येत असेल.

पण या सर्वांचे नियंत्रण वर स्वर्गात आहे. याची जाणीव वारंवार स्वर्गातल्या देवांनी पृथ्वीवरच्या देवांना ठेवायला सांगितली. यातूनच या पुराण कथांचा जन्म झाला असू शकतो ज्यामुळे ते तंत्रज्ञान लपवणे सोप्पे जावे आणि देवांचा दबदबा हि कायम राहावा.

पुढे काही कारणास्तव हा संपर्क तुटला असेल. (किंवा आत्ता आपण पृथ्वीची जशी वाट लावतोय तशी स्वर्गाची वाट लाऊन देवांनी दुसरा एखादा ग्रह काबीज केला असेल.
आणि ते तिथे एकदा सेट झाले कि मग परत इकडे संपर्क करणार असतील कदाचित)

पण तिथला संपर्क नाहीये म्हंटला कि पृथ्वीवर आपला आपला स्वार्थ साधण्यासाठी इथल्या देवांनी अनेक ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले. वेगवेगळी नावे धारण केली. आणि आपापसात भांडत सुटले.(पण आता जेंव्हा रिमोट कंट्रोल सुरु होईल तेंव्हा काय होईल कोणास ठाऊक.) ...आणि अशा प्रकारे वेगवेगळे धर्म, जाती,भाषा तयार झाल्या असाव्यात.पण आता परत वरच्या देवांच खरं खुरं नियंत्रण सुरु होईल.(त्यांची लोकसंख्या आता किती असेल कोण जाणे.)
म्हणजेच अस्तित्वात असलेल्या ख-याखु-या शक्तीचं मानवी जीवनावर नियंत्रण सुरु होईल.
(आहे ना भीतीदायक!)
 मग सुरु करा आता देवाचं नाव घ्यायला काय!
(ता. क.: ह्या शिळोप्याच्या गप्पा असल्याने कुणी आपल्या भावना वगैरे दुखावून घेऊ नये ही विनंती. ह्याउपरही दुखावल्या गेल्यास क्षमस्व.)