Saturday, November 23, 2013

चला बऱ्याच दिवसांनी भेटलो आज.....
आजपासून परत गप्पा म्हणजे त्याच शिळोप्याच्या गप्पांना सुरुवात करू...
काय म्हणता...
हो ना ... निव्द्नुलीचा मोसम आहेच... आणि विषय पण भरपूर असतात या मोसमात....
आपण खरच ज्याला थोड डोक्यावर घेतो... तीच व्यक्ती धप्पकन खाली पडायला का आतुर असते तेच कळात नाही...

आत्ता परवा परवा पर्यंत जे 'तरुण' म्हातारे होते... त्यांच्या उर्मी बद्दल आम्ही भरभरून बोललो...
तर लगेच त्यांनी त्यांची... गर्मी  दाखवली..... असो.....
पण आपल्याला बोलायला विषय आहे खास.... काय...भेटू मग

Friday, November 22, 2013

राजे सांगून येणार नाहीत....
आले तर परत जाणार नाहीत...
अनुशास्त्रांच्या युगात तलवार घेतील...
इतकेही ते वेडे नाहीत...
दूरदृष्टी त्यांची कधी...
आपल्या ध्यानी येणार नाही....
आता राजे असते तर...
मार्केट आधी काबीज झाले असते...
चलनवाढ होण्याऐवजी पिक पाणी वाढले असते...

  इथे देशाचा विकास म्हणजे आपली प्रगती खुंटते...
शेतीवर सेझ बांधून धान्य टंचाई वाढते...
बायकापोरी बद्दल तुम्ही खरच आदर दाखवता?
  होणा-या अत्याचारावर निषेध तरी नोंदवता...

शंढ समाजाने कधी तक्रार करू नये...
आणि वीर पुरुषाला खरं तर बोलावूही नये...

गेला इतिहास गेला गड्यांनो
कितीदा तोच घोकणार...
इतिहासामधून  खरं..
आपण कधी शिकणार.....

आपला शत्रू आता खरं तर...
आपणच शोधून तुडवला पाहिजे...
आपणच प्रत्येकातून.....
नवीन  "शिवाजी" घडवला पाहिजे.......

"जय भवानी...  जय शिवाजी..."