मी २-४ दिवसंखाली अपर्णा वेलणकर यांनी अनुवादित केलेल्या ब्रेडविनर आणि परवाना या कादंब-या वाचल्या.
आणि त्या वाचताना मी त्यात इतकी गुंतत गेले कि मी स्वतः त्या परवाना सोबत तिथे आहे असं मला वाटू लागले.
ती भीती,दहशत, मृत्युच्या भयाण सावटाची भीषणता,आणि त्यासोबत दोन हात करायची साहस असलेली परवाना....
या सगळ्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत अस मला वाटत होतं. ती भुकेल्या पोटी फिरत असताना.. असेल तसलं.. शिळं-पाकं अन्न पुरवून स्वतः आणि सोबतच्या छोट्या मुलांना खाऊ घालत असताना आणि कित्येक दिवस उपाशी पायपीट करत असताना मी पण तिथे तिच्या सोबत आहे असच सारख वाटत होतं.
या वातावरणात मी इतकी गुरफटले होते कि मी ते शब्दात नाही सांगू शकणार कदाचित.
पण त्या दिवशी मी रात्री जेवणार नव्हते आणि प्रवीणपुरता भात होता. त्याने जेवता जेवता मला विचारलं तुला भूक लागली तर....
मी त्याच वातावरणात... मला दोन मिनिट खरेच काही सुचले नाही वाटलं मी परवानासोबातच आहे. आणि २ मिनिटांनी भानावर आल्यावर मला इतक छान वाटलं....
मी उत्तर दिलं... मी भारतात आहे... इथे लोकशाही आहे.. मी घरात सुखरूप आहे... आणि घरात करून खाण्यासाठी भरपूर काही आहे... मी करून खिन काही तरी....
खरं सांगते माझ्या डोळ्यात तेंव्हा पाणी होतं. माझ्या मनात एक अजब मिश्रण होतं. आनंद, भीती, दहशत,आणि मी जो स्वार्थीपणाचा विचार केला त्याची लाज....
पण काहीही असो माणूस स्वार्थी असतोच. त्याला स्वतः सुखी आहोत यापेक्षा दिलासा देणारी गोष्ट जगात नसते.
पण 'तालिबान' या शब्दातली भयावहता मला अशी जाणवली...अशा लाखो परवाना आणि त्यांची कुटुंबे हे कित्येक वर्ष सहन करतायत त्याच्याशी लढा देत आहेत.
त्यांना माझा 'सलाम'.
का अशी माणसं माणसांच्या जीवावर उठतात.... का इतक्या छोट्या मुलांच्या नशिबी असे भोग... का? हा प्रश्न मनातून जात नाही....
देवाकडे एकाच मगन मागावे वाटते.... देवा जगात कधी कुणालाच दुःखी ठेऊ नकोस... आणि छोट्या लेकरांना तर नकोच नकोच.... कुणाच्या मनात अत्याचार करण्याचे विचार येऊ नयेत.... कुणावर अत्याचार होऊ नयेत.... सगळे सुखी राहावेत..... ज्ञानेश्वरांचे पसायदान पूर्ण व्हावे....
संथ निळे हे पाणी
12 years ago


No comments:
Post a Comment