काल परवा तो योग आला. अगदी एकहाती वाचावी अशी कादंबरी आहे (छोटीही आहे!)
मानवी जीवन नव्हे आशावादी मानवी जीवन कसे असते आणि कसे असावे याचे अतिशय सुंदर चित्रण या कादंबरीत केले आहे.
दुस-याच्या दुःखात आपले दुःख माणूस कसे विसरून जातो याचे अप्रतिम वर्णन आहे.
दुस-याकडून अपेक्षा करताना स्वतःची कर्तव्ये कशी विसरली जातात.
सूडभावनेपोटी होणारं माणसाचं अधःपतन आणि पर्यायाने स्वतःचा नाश हे जीवनाचे जीवनाचे समीकरण सांगितले आहे.
मानवी जीवनातले प्रेम ही भावना कशी व्यापक आहे... ती फक्त नात्यांमध्ये अडकून रहात नाही... ती समदुःखी.... समविचारी... लोकांना बांधून ठेवणारा एक धागा आहे.
त्याला नात्याचे...वयाचे...बंधन नसते...
प्रेम म्हणजे वासना नव्हे किंवा आकर्षण ही नव्हे...
पण समवयस्क लोक असतील तर या प्रेमाला आकर्षणाची किनार मिळणेही स्वाभाविक आहे.
पण म्हणून ते प्रेम लगेच कलंकित होऊ शकत नाही.
असे प्रेम उदात्त असते. त्यात स्वार्थ नसतो. आणि कुणाचे नुकसानही नसते.
असा उदात्त प्रेमाचा अविष्कार आहे.
पण.....
असा उदात्त प्रेमाचा अविष्कार मांडता मांडता खांडेकर अचानक या भावनेला परत नात्यातच का गुंतवून टाकतात ते काही काळात नाही....
या भावनेला शेवटी ते बहिण-भावाच्या नात्यात अडकवून टाकतात...... असे का?
या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही.
जर तुम्हाला मिळाले तर..............
मी उत्तराच्या प्रतीक्षेत आहे
( ता. क.: पुस्तक जरूर वाचा...... अनेक सुंदर वाक्यांनी सजलेली कलाकृती.... मला आवडलेली वाक्ये लवकरच पोस्ट करणार आहे.)


This comment has been removed by the author.
ReplyDeleteअतिशय उत्तम कथा आहे .खरच माणसाच्या भावविश्वा विषयी अप्रतिम लेखन ..:)
ReplyDelete